कै. ज्ञानदेव दाजी बळवंतराव यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ ह-भ-प श्री. अंकुश रणखांबे महाराज यांचे कीर्तन संपन्न
प्रतिनिधी: समाधान रजपूत
नीरा नरसिंगपूर तालुका इंदापूर येथे कै. ज्ञानदेव दाजी बळवंतराव यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ ह. भ. प. श्री. अंकुश तात्या रणखांबे महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित केले होते.यावेळी टाळकरी, भजनी मंडळी आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.ह. भ. प. श्री. रणखांबे महाराज यांनी अतिशय छान आणि सुंदर पद्धतीने कीर्तन केले. त्याच्यानंतर पै- पाहुण्यांचे सत्कार समारंभ झाले आणि भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी गावातील प्रतिनिधी डॉ.सिद्धार्थ सरवदे ,आजी- माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ व पै-पाहुणे उपस्थित होते.