June 30, 2025 9:21 pm

वडिलांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ मुलाने घेतले भव्य दिव्य असे रक्तदान शिबिर.

अपनी भाषा में पढ़े! Translate

वडिलांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ मुलाने घेतले भव्य दिव्य असे रक्तदान शिबिर.

प्रतिनिधी: समाधान रजपूत

           नीरा नरसिंगपूर तालुका इंदापूर येथे कलियुगातील श्रावण बाळा समजल्या जाणाऱ्या राजेंद्र ज्ञानदेव बळवंतराव यांनी आपले पिता कै. ज्ञानदेव बळवंतराव यांच्या प्रथम पुण्यस्मरण  धुलवडीच्या दिवशी रक्तदान शिबिर घेऊन आपल्या पित्याला व समाजाला अभिमान वाटेल अशी गोष्ट केली .या रक्तदान शिबिरामध्ये इंदापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध मुक्ताई ब्लड बँक यांनी नीरा नरसिंगपूर येथे ब्लड डोनेशन कॅम्प घेतला. यावेळी इंदापूर तालुक्याचे मा.नगरसेवक प्रशांत दादा सीताफ, इंदापूर तालुका शिवसेना शहर प्रमुख देवा मगर, विविध विकास सोसायटीचे चेअरमन आनंद काकडे, निरा नरसिंहपुर गावचे सरपंच प्रतिनिधी चंद्रकांत सरवदे, व ,डॉ. सिध्दार्थ सरवदे ,मा. उपसरपंच नरहरी काळे, प्रसिद्ध उद्योगपती विजय सरवदे, डॉ. पराग अवचट, डॉ.अतुल मिटकल, डॉ. अरुण वैद्य, डॉ. सिद्धार्थ सरवदे, पुणे जिल्हा कोळी महासंघ अध्यक्ष राजेंद्र हजारे, सूर्योदय परिवार इंदापूर तालुका प्रतिनिधी प्रदीप पवार, इंदापूर तालुका कोळी महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रेय कोळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन केले आणि रक्तदात्यांनी रक्तदान करण्यास सुरुवात केली.
   यावेळी मुक्ताई ब्लड बँकेचे डॉक्टर व कर्मचारी डॉ.दादा माने, सौरभ ननवरे, चंद्रकांत गायकवाड, अक्षय राऊत, सुरज टिंगरे, राजू कामजे,प्रताप कोरेकर यांनी रक्तदात्यांचे रक्तदान घेण्याचे काम व सर्टिफिकेट आणि रक्तदात्यांना ब्लूटूथ किंवा टी-शर्ट देण्याचे काम पाहिले.
 विविध मान्यवरांची भाषणे आणि स्वागत सत्काराचा कार्यक्रम पार पडल्यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले इंदापूर तालुक्यातील व नीरा नरसिंगपूर पंचक्रोशीतील संतोष आप्पा मोरे,अरुण क्षीरसागर, सिनेअभिनेते व दिग्दर्शक नितीन सरवदे, बळीराम गलांडे, अण्णासाहेब काळे, धनंजय पवार, इंदापूर तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर जगताप, शेतकरी संघटनेचे प्रभारी प्रशांत बादले पाटील, उमेश घोडके, समाधान बळवंतराव, उमेश कोळी, दशरथ राऊत, सुजित भैय्या राऊत,प्रणित बळवंतराव, गोविंद वृद्धाश्रम टेंभुर्णी चे चालक देशमुख महाराज, शंभू कोळी, एकनाथ सरवदे, भैय्या भंडलकर, बच्चन सरवदे, गोरख लोखंडे, आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!