June 30, 2025 2:03 pm

पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांना रुग्णालयातून सुट्टी

अपनी भाषा में पढ़े! Translate

पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांना रुग्णालयातून सुट्टी

नागपूर //नंददत डेकाटे

लॉंगमार्च प्रणेते आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (पीरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष,माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांची प्रकृती स्थिर असून त्यांनी उपचाराला उत्तम प्रतिसाद दिला असून आज प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांना रुग्णालयातुन संपूर्ण तपासणी नंतर सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आली आहे अशी माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांचे पुत्र जयदीप कवाडे यांनी आज दिली आहे. या प्रसंगी जयदीप कवाडे यांनी डॉ. सुहास कानफाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांची एक विशेष टीम प्रा.कवाडे यांच्या उपचार करीत होती,त्याबद्दल डॉक्टरांचे विशेष आभार मानले.
आज रुग्णालयातुन सुट्टी झाल्यानंतर प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांचे लक्ष्मीनगर येथील घरी (निवस्थानी) आगमन होताच सर्वप्रथम प्रा.जोगेंद्र कवडे सर यांच्या सुनबाई सौ. प्रतिमाताई जयदीप कवाडे यांनी प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांचे निळ लावून व पुष्प अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण केले. लवकरच प्रा.जोगेंद्र कवाडे सर हे संघटना कार्यात नव्या ऊर्जेने रूजू होतील अशी माहिती जयदीप कवाडे यांनी दिली आहे. असंख्य कार्यकर्ते,पदाधिकारी तसेच संघटनेचे प्रेम आणि आशिर्वाद सरांच्या पाठिशी असल्याने ते लवकर ठणठणीत बरे होतील, असे जयदीप कवाडे म्हणाले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!