July 1, 2025 1:55 am

अनिकेत भरणे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा.

अपनी भाषा में पढ़े! Translate

अनिकेत भरणे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा.

इंदापूर प्रतिनिधी – आदित्य बोराटे

 महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या, व मदतीसाठी आपुलकीने, हक्काने सर्वांच्या पाठीशी उभे राहत आलेले कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अनिकेत भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त अंथुर्णे व भरणेवाडी ग्रामस्थांच्या वतीने मोफत ई-श्रम कार्ड वाटप करण्यात आले.
    पोलिस भरतीपुर्व प्रशिक्षणार्थीना मोफत किटचे अनावरण व वाटप,इंदापूरचे गटविकास अधिकारी विजयकुमार परिट,भिगवण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, आणि वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.न.लातुरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले,तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत भरणे  यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

     यावेळी भरणेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच दीपक भरणे, प्रगतशील बागायतदार निलेश धापटे,दिपक गलांडे,नागेश धुमाळ,यांच्यासह तसेच प्रतिष्ठानचे सदस्य, प्रशिक्षणार्थी व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून अनिकेत भरणे यांना शुभेच्छा दिल्या व वेळोवेळी तत्पर मदत प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत असलेल्या सामाजिक, आर्थिक, आरोग्य तसेच शैक्षणिक मदतीबद्दल आभार व्यक्त केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!