स्वातंत्र्य दिनानिमित्त माननीय राकेश जी राणा यांच्याकडून निवारा बालगृहातील मुलांसाठी अन्नदान

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-08-18 at 12.12.26 PM (1)

स्वातंत्र्य दिनानिमित्त माननीय राकेश जी राणा यांच्याकडून निवारा बालगृहातील मुलांसाठी अन्नदान
वाशी-नवी मुंबईतील दानशूर व्यक्तीचा सामाजिक उपक्रम

(निलेश गायकवाड)

वाशी, नवी मुंबई:
माननीय श्री राकेश जी राणा सर यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त निवारा बालगृह, वाशी येथील मुलांसाठी अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला.

या दिवशी बालगृहातील सर्व मुलांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडला. त्यानंतर श्री राणा सर यांच्याकडून मुलांसाठी पौष्टिक आणि चविष्ट जेवणाची व्यवस्था करण्यात आली. मुलांनी स्वातंत्र्य दिन साजरा करून त्यांना देशभक्तीपर गाणी आणि संदेशही दिले गेले.

विशेष म्हणजे श्री राकेश जी राणा सर हे या बालगृहासाठी वेळोवेळी सहकार्य करत असतात. यापूर्वीही त्यांनी सणासुदीला आणि इतर प्रसंगी मुलांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

या उपक्रमावेळी बालगृहाचे पदाधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवक उपस्थित होते. बालगृहाच्या वतीने श्री राणा सर यांचे आभार मानले.

“मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य हेच आमच्यासाठी सर्वात मोठे बक्षीस आहे” असे त्यांनी बोलताना श्री राणा सर म्हणाले. त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!