15 ऑगस्ट निमित्त निवारा बालगृहातील 100 मुलांसाठी श्री महालक्ष्मी मोटर्सकडून अन्नदान
स्वातंत्र्यदिनाचा उत्साह अनाथ मुलांसोबत साजरा
(निलेश गायकवाड)
—
जामखेड, अहमदनगर:
स्वातंत्र्याच्या 79 व्या वर्धापनदिनानिमित्त श्री महालक्ष्मी मोटर्स, जामखेड यांच्या वतीने येथील निवारा बालगृहातील 100 मुलांसाठी अन्नदानाची सोय करण्यात आली.
बालगृहातील मुलांनी ध्वजारोहण करून या उपक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर सर्व मुलांना पौष्टिक आणि चविष्ट भोजन देण्यात आले. अन्नदानावेळी मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
सामाजिक बांधिलकीचा संदेश
प्रसंगी त्यांनी बोलताना सांगितले श्री महालक्ष्मी मोटर्सचे काळे साहेब म्हणाले, “स्वातंत्र्यदिन हा केवळ सण नसून तो समाजातील गरजू घटकांसोबत साजरा करण्याचा दिवस आहे. पुढेही आम्ही अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी राहू आणि लागेल ती मदत मिळवून देऊ.”
निवारा बालगृहाच्या वतीने श्री महालक्ष्मी मोटर्सचे आभार मानण्यात आले
दरम्यान, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
उपस्थित कार्यक्रमासाठी बालगृहाचे सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.