न्यूज
ब्रेकिंग

ni “भिगवण पोलीस स्टेशनचा राष्ट्रीय सन्मान! पो.नि. सोमनाथ शेंडगे व पो.अं. सचिन पवार यांना केंद्रीय ‘उत्कृष्ट सेवा पदक'”

IMG-20260816-WA0693 देशभक्तीच्या जयघोषात लोकमान्य शिक्षण मंडळ संचालित ‘नवीन मराठी शाळेत’ तिरंगा रॅली उत्साहात संपन्न..

IMG-20260816-WA0690 पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन ध्वजवंदन करीत व राष्ट्रीय भक्ती गीत गायन स्पर्धा घेऊन उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न

IMG-20260816-WA0687 श्रीमती द्रौ रा कन्या शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला…….

IMG-20260816-WA0673 ‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

“भिगवण-राशिन रोडवरील उड्डाणपुलावर मोठा खड्डा आणि बाहेर आलेल्या सळ्या; 12 तास उलटले तरी PWD चे दुर्लक्ष, रात्री मोठा अपघात होण्याची भीती”

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-08-08 at 7.24.40 PM

“भिगवण-राशिन रोडवरील उड्डाणपुलावर मोठा खड्डा आणि बाहेर आलेल्या सळ्या; 12 तास उलटले तरी PWD चे दुर्लक्ष, रात्री मोठा अपघात होण्याची भीती”

(निलेश गायकवाड)

भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे : दि. 07/08/2026
भिगवण-राशिन रोडवरील उड्डाण पुलावर रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा पडला असून त्यामधून लोखंडी गज आणि सळई बाहेर आल्या आहेत. या धोकादायक स्थितीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, भिगवण च्या अधिकाऱ्यांचे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. तक्रार करून 12 तासांपेक्षा जास्त वेळ उलटून गेला तरी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.

प्रवाशांचा जीव धोक्यात
दिवसा वाहनांची वर्दळ कमी असल्याने अपघात टळत आहेत, परंतु रात्रीच्या वेळी या ठिकाणी मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. खड्डा आणि बाहेर आलेल्या सळ्यांमुळे दुचाकी, चारचाकी वाहन चालकांचा तोल जाऊन अपघात होऊ शकतो. त्यामुळे या मार्गाने ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.

ठेकेदार कोण? कारवाई कधी?
सदर उड्डाण पूल तापडिया कॉन्ट्रॅक्टर यांच्यामार्फत बांधण्यात आला आहे. निकृष्ट दर्जाचे काम आणि देखभालीअभावी अवघ्या काही वर्षातच पुलाची ही अवस्था झाली आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

स्थानिकांनी PWD भिगवण कार्यालयात तक्रार करूनही अद्याप बॅरिकेड्स लावणे, खड्डा बुजवणे यासारखी तात्पुरती उपाययोजना देखील केलेली नाही.

नागरिकांची मागणी
नागरिकांनी प्रशासनाला तातडीने या ठिकाणी बॅरिकेड्स लावून दुरुस्तीचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा उद्या एखादा मोठा अपघात घडल्यास त्याला पूर्णतः सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...

‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

error: Content is protected !!