‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात
अमळनेर : विक्की जाधव.
प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले.
निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला.
सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.