न्यूज
ब्रेकिंग

ni “भिगवण पोलीस स्टेशनचा राष्ट्रीय सन्मान! पो.नि. सोमनाथ शेंडगे व पो.अं. सचिन पवार यांना केंद्रीय ‘उत्कृष्ट सेवा पदक'”

IMG-20260816-WA0693 देशभक्तीच्या जयघोषात लोकमान्य शिक्षण मंडळ संचालित ‘नवीन मराठी शाळेत’ तिरंगा रॅली उत्साहात संपन्न..

IMG-20260816-WA0690 पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन ध्वजवंदन करीत व राष्ट्रीय भक्ती गीत गायन स्पर्धा घेऊन उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न

IMG-20260816-WA0687 श्रीमती द्रौ रा कन्या शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला…….

IMG-20260816-WA0673 ‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

बारामती तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई;बुलेट चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळल्या!

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-08-14 at 12.51.16 PM

बारामती तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई;बुलेट चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळल्या!
आरोपीकडून १३ बुलेटसह ६ मोटारसायकली हस्तगत

बारामती | प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

बारामती शहर तसेच बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून वाढलेल्या बुलेट व मोटारसायकल चोरीच्या घटनांचा स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका पोलिसांनी छडा लावला आहे. सराईत मोटारसायकल चोरट्याला अटक करून त्याच्याकडून तब्बल १३ बुलेट आणि ६ इतर मोटारसायकली अशा एकूण १९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या वाहनांची अंदाजे किंमत ३० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या कारवाईमुळे बारामती शहर आणि बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेले १९ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष पथके तयार केली होती. या पथकांना रात्रगस्त, पेट्रोलिंग, संशयित वाहने व व्यक्तींची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांचे पथक बारामती शहर परिसरात गस्त घालत असताना मेडिकल कॉलेज परिसरात एक संशयित व्यक्ती चोरीची मोटारसायकल घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला.

काही वेळाने एक संशयित व्यक्ती चोरीची मोटारसायकल घेऊन पेन्सिल चौकाकडून मेडिकल कॉलेजच्या दिशेने जाताना पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव समाधान बाळू काळे (वय २३, रा. मानेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असे सांगितले.

पोलिसांनी विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपीने रात्रीच्या वेळी बुलेटसह इतर मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे, चोरी केलेल्या काही वाहनांवर महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र वनसेवा आणि एसटी महामंडळाचे लोगो लावून पोलिसांची दिशाभूल करण्याचा तसेच चोरीच्या वाहनांचा वापर करून पोलिसांपासून बचाव करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे.

WhatsApp Image 2026-08-14 at 12.54.52 PM

आरोपीकडून १३ बुलेट मोटारसायकली आणि ६ इतर मोटारसायकली अशा एकूण १९ दुचाकी जप्त करण्यात आल्या. या वाहनांची एकूण अंदाजे किंमत ३० लाख रुपये आहे.
१) MH ४२ BK ३००३, २) MH ४२ AV २१२१, ३) MH ४२ BK ०७४९, ४)MH ४२ BK ९७०९, ५) MH ४२ BD ९४९०, ६) MH ४२ AT ५४५५, ७) MH ४२ AZ ०३७४, ८) MH ४२ AZ १६१६, ९) MH ४२ AB १२१२, १०) MH ४२ TG २६७७, ११) MH ४२ AV ७८६९, १२) MH ४२ UQ ०३०३, १३) MH ४२ EA ९९७७, व ६ इतर मोटार सायकल असा जप्त करण्यात आल्या आहे.

या कारवाईमुळे बारामती शहर आणि बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेले एकूण १९ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी सध्या पोलीस कोठडी रिमांडमध्ये असून, चोरीच्या वाहनांमागे आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच आरोपीने इतर ठिकाणी अशाच प्रकारच्या चोरी केल्या आहेत का, याचा पुढील तपास बारामती तालुका पोलीस करीत आहेत.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, बारामती उप विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक सुधीर वाळुंज, श्रेणी पो.स.ई बाळासाहेब कारंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार शिवाजी निकम, किशोर तेलंग, स्वप्निल अहिवळे, शैलेश स्वामी, गुलाब पाटील, सुलतान डांगे, तुषार चव्हाण, रईस मुलानी, गणेश डेरे, बारामती तालुका पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार अभिजीत एकशिंगे, शशिकांत दळवी, भगवान थोरवे, मनोज पवार, सुरेंद्र वाघ, जितू शिंदे, भारत खारतोडे, जयश्री आटोळे, विठ्ठल तरंगे, यांनी केली आहे.

एकाच आरोपीकडून १९ दुचाकी जप्त झाल्याने बारामती परिसरातील वाहनचोरीच्या घटनांमध्ये मोठा उलगडा झाला असून, या कारवाईमुळे चोरीला गेलेल्या वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...

‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

error: Content is protected !!