“मदनवाडीत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी”
“कार्याला अभिवादन, सामाजिक कार्याचा संकल्प”
(निलेश गायकवाड)
मदनवाडी, दि. 11 ऑगस्ट 2026 : प्रतिनिधी
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 291वी पुण्यतिथी आज मदनवाडी गावात मोठ्या उत्साहात आणि आदराने साजरी करण्यात आली.
गावातील विविध सामाजिक व राजकीय पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या वतीने अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या प्रसंगी वक्त्यांनी राजमाता अहिल्यादेवी यांच्या लोककल्याणकारी कार्य, न्यायदान आणि धर्मासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव केला. स्त्री सक्षमीकरण, शेती, शिक्षण आणि मंदिरे-घाटांच्या पुनर्बांधणीसाठी त्यांनी केलेले काम आजही प्रेरणादायी असल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रमात गावातील मान्यवरांनी “अहिल्यादेवींच्या विचारांप्रमाणे समाजसेवा करू” असा संकल्प केला.
या कार्यक्रमाला गावातील मार्केट कमिटे चे संचालक आबसो देवकाते, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वासराव देवकाते, यात्रा कमेटी उत्सव प्रमुख रंगनाथ देवकाते, मा. उपसरपंच राजाभाऊ देवकाते प्रमुख व कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन स्थानिक कार्यकर्त्यांनी केले.