न्यूज
ब्रेकिंग

ni “भिगवण पोलीस स्टेशनचा राष्ट्रीय सन्मान! पो.नि. सोमनाथ शेंडगे व पो.अं. सचिन पवार यांना केंद्रीय ‘उत्कृष्ट सेवा पदक'”

IMG-20260816-WA0693 देशभक्तीच्या जयघोषात लोकमान्य शिक्षण मंडळ संचालित ‘नवीन मराठी शाळेत’ तिरंगा रॅली उत्साहात संपन्न..

IMG-20260816-WA0690 पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन ध्वजवंदन करीत व राष्ट्रीय भक्ती गीत गायन स्पर्धा घेऊन उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न

IMG-20260816-WA0687 श्रीमती द्रौ रा कन्या शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला…….

IMG-20260816-WA0673 ‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

अमळनेरच्या भूमीत साकार होणार सावित्री माय आणि जोतिबा फुले यांचे भव्य स्मारक!

अपनी भाषा में पढ़े! Translate

f90b4abad43ec73c8fb6dbd5fcb9809a_original

अमळनेरच्या भूमीत साकार होणार सावित्री माय आणि जोतिबा फुले यांचे भव्य स्मारक!

 

२०१६ पासूनच्या मागणीला अखेर यश; नगरपरिषदेच्या सभेत जागा निश्चित करण्याचा ठराव मंजूर

 

अमळनेर : विक्की जाधव.

अमळनेरच्या सामाजिक आणि वैचारिक भूमीत आता क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल पडले आहे. सन २०१६ पासून सुरू असलेल्या मागणीला अखेर यश मिळाले असून, ११ ऑगस्ट रोजी झालेल्या अमळनेर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत बसस्थानक जवळील गांधी नगर कॉर्नर परिसरातील जागेवर फुले दाम्पत्याचे स्मारक उभारण्यासाठी जागा निश्चित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तब्बल दहा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर झालेल्या या निर्णयामुळे फुलेप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, क्षत्रिय माळी समाज मंडळ यांसह अमळनेर तालुक्यातील फुलेप्रेमी नागरिकांनी या मागणीसाठी सातत्याने आवाज उठविला. “हे केवळ स्मारक नसून शिक्षण, समता, स्त्रीमुक्ती आणि सामाजिक न्यायाचा विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणारे प्रेरणास्थळ असावे,” अशी भावना समता परिषदेचे जिल्हा संघटक भिमराव महाजन यांनी व्यक्त केली.  नगरपरिषदेच्या निर्णयाबद्दल समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगनरावजी भुजबळ तसेच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...

‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

error: Content is protected !!