न्यूज
ब्रेकिंग

ni “भिगवण पोलीस स्टेशनचा राष्ट्रीय सन्मान! पो.नि. सोमनाथ शेंडगे व पो.अं. सचिन पवार यांना केंद्रीय ‘उत्कृष्ट सेवा पदक'”

IMG-20260816-WA0693 देशभक्तीच्या जयघोषात लोकमान्य शिक्षण मंडळ संचालित ‘नवीन मराठी शाळेत’ तिरंगा रॅली उत्साहात संपन्न..

IMG-20260816-WA0690 पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन ध्वजवंदन करीत व राष्ट्रीय भक्ती गीत गायन स्पर्धा घेऊन उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न

IMG-20260816-WA0687 श्रीमती द्रौ रा कन्या शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला…….

IMG-20260816-WA0673 ‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

मोटारसायकल चोरास केली अटक; दोन दुचाकी जप्त

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260813-WA0503

अमळनेर पोलिसांनी मोटारसायकल चोरास केली अटक; दोन दुचाकी जप्त

अमळनेर : विक्की जाधव.

शहरातील श्रीराम कॉलनी, शिरूड नाका परिसरातून चोरीस गेलेल्या मोटारसायकल चोरीचा गुन्हा अमळनेर पोलिसांनी उघडकीस आणला असून, या प्रकरणी विनायक उखा पाटील (रा. वेळोदे, ता. चोपडा, जि. जळगाव) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून चोरीची मोटारसायकलसह आणखी एक दुचाकी असा एकूण दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

श्रीराम कॉलनी, शिरूड नाका येथील रहिवासी हरेश गंभीर चौधरी यांची सुमारे २५ हजार रुपये किमतीची हिरो होंडा सीडी डिलक्स मोटारसायकल (क्र. एमएच १९ ए.क्यू. २१६२) अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४१२/२०२६ अन्वये भा.न्या.संहितेच्या कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना विनायक उखा पाटील हा चोरीच्या मोटारसायकली विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक शरद काकळीज, पोलिस हवालदार प्रमोद पाटील, पोलिस अंमलदार नरेश बडगुजर, नितीन मनोरे व उज्वल पाटील यांच्या पथकाने संशयिताचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याकडून चोरीस गेलेली दुचाकी तसेच आणखी एक मोटारसायकल जप्त करण्यात आली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून, संशयिताविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...

‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

error: Content is protected !!