पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी नगरसेवक नसीर हाजी यांचा पुढाकार अनेक महिन्यापासून बंद असलेल्या बोअर ला मोटार लावून केले पुनर्जीवन
अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील कसाली भागात गेल्या काही दिवसांपासून पाण्याची टंचाई जाणवत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीची दखल घेत मा. नगरसेवक नसीर हाजी यांनी पुढाकार घेत अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या बोअरवेलला मोटार बसवून पुन्हा सुरू केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पाण्याचा एक अतिरिक्त स्रोत उपलब्ध झाला असून, पाण्यासाठी होणारी नागरिकांची धावपळ काही प्रमाणात कमी झाली आहे.
बंद असलेला बोअर पुन्हा कार्यान्वित झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाणीटंचाईच्या काळात नागरिकांची गरज लक्षात घेऊन प्रत्यक्ष उपाययोजना करण्यात आल्याने नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत होत आहे. उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून परिसरातील नागरिक आपली दैनंदिन पाण्याची गरज भागवत आहेत.
यावेळी मा. नगरसेवक फिरोज पठाण, सुपडू मनियार, बशीर दादा मोमीन, नईम पठाण, रिजवान अन्सारी, वसीम बेलदार, कलीम मनियार, जाविद मोमीन यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी अशाच प्रकारे आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.