न्यूज
ब्रेकिंग

ni “भिगवण पोलीस स्टेशनचा राष्ट्रीय सन्मान! पो.नि. सोमनाथ शेंडगे व पो.अं. सचिन पवार यांना केंद्रीय ‘उत्कृष्ट सेवा पदक'”

IMG-20260816-WA0693 देशभक्तीच्या जयघोषात लोकमान्य शिक्षण मंडळ संचालित ‘नवीन मराठी शाळेत’ तिरंगा रॅली उत्साहात संपन्न..

IMG-20260816-WA0690 पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन ध्वजवंदन करीत व राष्ट्रीय भक्ती गीत गायन स्पर्धा घेऊन उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न

IMG-20260816-WA0687 श्रीमती द्रौ रा कन्या शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला…….

IMG-20260816-WA0673 ‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन ध्वजवंदन करीत व राष्ट्रीय भक्ती गीत गायन स्पर्धा घेऊन उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260816-WA0690

पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन ध्वजवंदन करीत व राष्ट्रीय भक्ती गीत गायन स्पर्धा घेऊन उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न..

 

अमळनेर : विक्की जाधव 

पी. बी.. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आणि 80वा स्वातंत्र्य दिन ध्वज फडकावून तसेच राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धा घेऊन उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला. सकाळ मंगल प्रहरी शाळेच्या प्रांगणात देशभक्तीमय संदेश देणाऱ्या रांगोळ्या व आकर्षक फुलांच्या पाकळ्यांनी सज्जित सुंदर कलाकृती तयार करण्यात आल्या होत्या. आजचे वातावरणात देशभक्तीपर गीतांनी घोषणांनी व विद्यार्थ्यांच्या वेशभूषांनी राष्ट्रभक्तीमुळे भावनांनी ओतप्रोत ओसंडून वाहत होते. सर्वप्रथम मान्यवर मुख्याध्यापक जे. एस. देवरे यांच्या शुभहस्ते ध्वज फडकावून त्याच मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून आजच्या युवा पिढीला आवाहन करीत म्हणाले की, आपणसुद्धा आपले देशकर्तव्य-दायित्व व आपली निस्सिम भक्ती देशासाठी व्यक्त करून एका महासत्ता स्वरूपात भारताला ओळख निर्माण करून दिली पाहिजे. यावेळी जलसंवर्धन, मृदा संवर्धन शपथ घेण्यात आली. यावेळी रोटरी क्लब अमळनेरचे अध्यक्ष श्री महेश पाटील समस्त कार्यकारी संचालक मंडळ विशेष अतिथी म्हणून या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यासोबत दिनांक 14. 8. 2026 रोजी शाळेच्या वतीने देशभक्ती मय भावना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सर्व मानवंदना कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर हाऊस वाईस देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नवीन जुने व देशभक्तीमय, रोमहर्षक भावना निर्माण करणारे व संदेश देणारे गीत गायन हे सामूहिक स्वरूपात करण्यात आले होते. यामध्ये लहान विद्यार्थी व मोठ्या विद्यार्थ्यांचा गट असे दोन विभाग करण्यात आले होते. विजयी गट त्याची नावे पुढीलप्रमाणे

विद्यार्थ्यांना उपहार स्वरूपात टॉफी चॉकलेट वाटण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ संगीत व गायक व संगीत विशारद श्री शरद सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन आफरीन शेख मॅडम यांनी केले. कार्यक्रमासाठी अनमोल मार्गदर्शन सहकार्य शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी,मुख्याध्यापक जे. एस.देवरे पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, व्ही.पी. बडवे, प्रशांत वंजारी, राजश्री पाटील, रूपाली पाटील, योगिनी ओवे, व्ही. जी. बोरोले, भावना चौधरी, व्ही.एस.अमृतकर, श्वेता कलंत्री, अनंत बागल, विनायक सूर्यवंशी योगिषा महाजन, सविता पारधी, कविता चौधरी, समस्त शिक्षकवृंदवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी वृंदवर्ग यांचे लाभले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...

‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

error: Content is protected !!