राम पिंजरकर रा. पिंपळगाव काळेचीं 8 वर्षाच्या प्रखर संघर्षाने पी. एस. आय (पोलीस उप निरीक्षक)पदी निवड….
प्रतिनिधी-संतोष शिंदे
राम पिंजरकर याने 2012 ला पदवी चे शिक्षण पूर्ण केले, परिस्थिती गरीब असून सुध्दा जिद्द, चिकाटी अंगी बाळगून वारंवार येणाऱ्या अपयशाला खचून न जाता आपले ध्येय गाठण्याचे सामर्थ्य त्याने दाखवले.आणि त्याच्या मेहनतीचे फळ त्याला 8 वर्षानंतर मिळाले शेवटी तो पोलिस उप निरीक्षक झालाच..नवीन तरुण पिढीला त्याच्याकडून एक प्रेरणा मिळाली.