अमळनेर नगरपालिका पाजतेय नागरिकांना दूषित पाणी?; प्रभाग ४ व ९ मध्ये संतापाचा उद्रेक

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260601-WA0755

अमळनेर नगरपालिका पाजतेय नागरिकांना दूषित पाणी?; प्रभाग ४ व ९ मध्ये संतापाचा उद्रेक

अमळनेर : विक्की जाधव.

एकीकडे स्वच्छ पाणीपुरवठ्याचे दावे करणारी अमळनेर नगरपालिका, तर दुसरीकडे नागरिकांच्या नळांना गटारीसारखा दुर्गंधीयुक्त आणि गढूळ पाणीपुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. प्रभाग क्रमांक ४ व ९ मधील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून येणारे पाणी पाहून संताप व्यक्त केला जात असून “हे पाणी प्यायचे की फेकून द्यायचे?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार नळातून येणाऱ्या पाण्याला तीव्र दुर्गंधी असून त्याचा रंगही बदललेला आहे. त्यामुळे हे पाणी पिण्यास तर अयोग्यच, पण घरगुती वापरासाठी देखील धोकादायक ठरत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत स्वच्छ पाण्याची गरज असताना दूषित पाणीपुरवठ्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो, डायरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढला असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे.

या गंभीर प्रकारावर माजी नगरसेवक सुरेश सखाराम चौधरी यांनी संतप्त प्रतिक्रिया देत प्रशासनाला जाब विचारला आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची तातडीने तपासणी करून दूषित पाणीपुरवठा थांबवावा, अन्यथा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शहरवासीयांना स्वच्छ पाणी देण्यात अपयशी ठरत असलेली नगरपालिका आता तरी जागी होणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!