द्रौ. रा. कन्या शाळेत राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी….
अमळनेर : विक्की जाधव.
खा.शि.मं. संचलित श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत ३०१ वी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी शाळेत व स्मारक येथे पुण्यराजमाता च्या प्रतिमेस माल्यार्पन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ एस एस सुर्यवंशी मॕडम , पर्यवेक्षक श्री एस पी वाघ सर , जेष्ठ लिपिक श्री शामभाऊ पवार , प्रयोगशाळा सहाय्यक श्री सतिश लाडगे सर .जेष्ठ शिक्षिका श्रीमती आर एस सोनवणे , जेष्ठ शिक्षक श्री एस एस माळी सर यांनी पुजन केले. सौ एस एस सुर्यवंशी मॕडमांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या राजकीय , सामाजिक व राष्ट्रीय कार्याची माहिती दिली.