पळसदेव येथे भाजपचा जल्लोष
देशाचे कर्तबगार पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या चारही राज्यांतील विधानसभा..
प्रतिनिधी :- युवराज नगरे पळसदेव
निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय झाल्याबद्दल आज पळसदेव या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी फटाके फोडून, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी पळसदेव भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रावसाहेब काळे, कार्याध्यक्ष किरण काळे, महेंद्र काळे, गणेश शास्ञी सर, पुणे जिल्हा भाजपा अल्प-संख्यांक आघाडीचे उपाध्यक्ष अक्रम अब्बास शेख, अक्षय काळे, दादाराम शिंदे, अनुज होरणे, मोहित काळे, बापू अडवाल यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.