June 30, 2025 9:23 pm

दौंड शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा व कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची दौंड तालुका काँग्रेस कमिटी ची मागणी

अपनी भाषा में पढ़े! Translate

दौंड शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा व कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची दौंड तालुका काँग्रेस कमिटी ची मागणी
प्रतिनिधी:-विकी ओहोळ
दौंड :-शहरात विविध ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा व सोडून दिलेल्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे त्यापैकी प्रभाग क्रमांक 1ते प्रभाग क्रमांक 7 या ठिकाणी अनेक प्रकारचे जनावरे, गाई, फिरिस्ती कुत्रे,वावरत आहेत व त्यांची विष्टा रस्त्यावर पडत आहे त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली जात आहे सदर जनावरे रस्त्यावर अचानक आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत सध्या शाळा सुरू झाल्या असल्यामुळे रस्त्यावर गर्दी असते व काही गाई किंवा कुत्रे शाळकरी मुलांच्या देखील अंगावर जातात तरी नगरपालिकेने सदर जनावरांचा मालकांना सूचना देऊन योग्य त्या ठिकाणी बंदिस्त करून पाळावे व नगरपालिकेला व सामान्य जनतेला सहकार्य करावे अशी मागणी महासचिव दौंड तालुका काँग्रेस कमिटी प्रकाश सोनवणे,उपाध्यक्ष महेश जगदाळे,सामाजिक कार्यकर्ता निलेश बगाडे व न्यू महाराष्ट्र पँथर सेनेचे जयदीप बगाडे यांनी केली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!