अमळनेर पळासदडे गावच्या सुपुत्राची विभागीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी; प्रवीण नाना पाटील यांची केंद्रप्रमुख पदावर निवड

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर पळासदडे गावच्या सुपुत्राची विभागीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी; प्रवीण नाना पाटील यांची केंद्रप्रमुख पदावर निवड

अमळनेर : विक्की जाधव.

पळासदडे  येथील सुपुत्र तथा पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक प्रवीण नाना पाटील यांनी केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा – 2025 मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत केंद्रप्रमुख पदासाठी निवड मिळवली आहे.

त्यांच्या या यशामुळे पळासदडे गावाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रवीण पाटील यांनी सातत्यपूर्ण परिश्रम, जिद्द आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर ही यशाची शिखरे गाठली आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पळासदडे विचार क्रांती युवा मंच तर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक व प्रशासकीय कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!