चारित्र्यावर संशय… पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला; पतीला ७ वर्षांची शिक्षा

अपनी भाषा में पढ़े! Translate

चारित्र्यावर संशय… पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला; पतीला ७ वर्षांची शिक्षा

अमळनेर : विक्की जाधव.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करणाऱ्या पतीला अमळनेर येथील सत्र न्यायालयाने ७ वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. भगवान रामदास शिंपी (वय ६०, रा. ताडेपुरा, पैलाड, ता. अमळनेर, जि. जळगाव) असे आरोपीचे नाव आहे.

१ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी फिर्यादी महिला मजुरीचे काम करून घरी आल्यानंतर ती मुलगी रोशनी हिच्याशी मोबाईलवर बोलत होती. यावरून आरोपीने तिच्या चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ करत मारहाण केली व “आज तुला मारून टाकतो” अशी धमकी दिली.काही वेळानंतर आरोपी पुन्हा घरी येऊन घरासमोर बसलेल्या पत्नीला चापट-बुक्क्यांनी मारहाण करत पॅन्टच्या खिशातून धारदार हत्यार काढून तिच्या गळ्यावर वार केला.

झटापटीदरम्यान तिच्या दोन्ही हातांवरही वार होऊन ती गंभीर जखमी झाली. दरम्यान मुलगा गणेश व परिसरातील नागरिक जमा झाल्याने आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. जखमी महिलेला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी मा. जिल्हा न्यायाधीश-१ व अति. सत्र न्यायाधीश श्रीमती सी. व्ही. पाटील यांच्या न्यायालयाने भा.दं.वि. कलम ३०७ अंतर्गत आरोपी दोषी ठरवत ७ वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाकडून अॅड. के. आर. बागुल यांनी ६ साक्षीदारांच्या साक्षी सादर करत प्रभावी युक्तिवाद केला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!