अमळनेरचा भूमिपुत्र सीए राधेश्याम अग्रवाल यांची ‘शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे’च्या उपाध्यक्षपदी निवड; शहराचा मान उंचावला
अमळनेर : विक्की जाधव.
शहराच्या शैक्षणिक परंपरेला नवा सन्मान मिळवून देत अंमळनेरचे भूमिपुत्र सीए राधेश्याम बजरंगलाल अग्रवाल यांची 2 मार्च 2026 रोजी शिक्षण प्रसारक मंडळी, पुणेच्या नियमक मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

पुण्यातील ही ख्यातनाम संस्था उच्च शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करत असून तिच्या अंतर्गत Sir Parashurambhau College (एस.पी. कॉलेज, पुणे),

Ramnarain Ruia Autonomous College, R.A. Podar College of Commerce and Economics तसेच Prin. L. N. Welingkar Institute of Management Development & Research यांसारख्या नामांकित संस्थांसह इतर अनेक शिक्षण शाखांचा समावेश आहे. अशा प्रतिष्ठित संस्थेच्या नेतृत्वात अंमळनेरच्या सुपुत्राची निवड होणे ही शहरासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
सीए राधेश्याम अग्रवाल यांच्या निवडीमुळे अंमळनेरच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचा अभ्यास, अनुभव आणि व्यवस्थापन कौशल्य यामुळे संस्थेच्या कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अंमळनेरच्या मातीतून घडलेले व्यक्तिमत्त्व पुण्यासारख्या शैक्षणिक केंद्रात महत्त्वाच्या पदावर विराजमान झाल्याने शहराचा मान पुन्हा एकदा उंचावला आहे.