July 1, 2025 1:06 pm

हम करे सो कायदा, हम करे सो सरकार ….! पोंधवडी मध्ये नानासो बंडगर यांच्या पॅनलचा दणदणीत विजय

अपनी भाषा में पढ़े! Translate

हम करे सो कायदा, हम करे सो सरकार ….! पोंधवडी मध्ये नानासो बंडगर यांच्या पॅनलचा दणदणीत विजय

(निलेश गायकवाड)

भिगवण दि.०९ : इंदापूर तालुक्यातील पोधवडी येथे नुकत्याच पार पडलेल्या श्री हनुमान सोसायटीच्या पंचवार्षीक निवडणूकित हनुमान विकास पॅनल चे सर्वेसर्वा नानासो अर्जुन बंडगर यांच्या पॅनलने तेरा जागेवरती, निवडणूक लढवून तेराच्या तेरा जागेवर तेरा उमेदवार निवडून आणण्याचे साहस करून दाखवत दणदणीत विजयी मिळवला आहे .

तसेच नानासो बंडगर यांनी कोणतीही निवडणूक असो त्यामध्ये हिरारीने सक्रिय सहभाग घेत विजयाचा गुलाल उधळला आहे . स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने नानासो बंडगर व त्यांच्या सर्व विजयी उमेदवार यांचे सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच पॅनल प्रमुख म्हणून प्रमुख दादासाहेब भोसले ,भरत यमगर सर ,रामभाऊ खारतोडे, दादासाहेब पवार ,सोमनाथ आटोळे ,यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले व निवडणूक निर्णय अधिकारी एस एस कदम हे होते . डॉ खारतोडे यांच्या चतुराईने उमेदवार चांगल्या फरकाने निवडून आल्याचे बोलले जात आहे

यावेळी विजयी उमेदवार ( १) आटोळे शंकर आबा (२) डॉ खारतोडे तुळशीराम नारायण (३) खारतोडे सुरेश एकनाथ (४) बंडगर दत्तात्रेय अण्णा (५) बंडगर दिपक विष्णु (६) बंडगर नानासाहेब अर्जुन (७) भोसले पोपट विठ्ठल (८) मलगुंडे दिपक वसंतराव (९) पवार नवनाथराव संभाजी (१०) पवार दत्तात्रेय हरीबा (११) सोनवणे यशवंतराव तुकाराम (१२) धुमाळ सुलोचना किसन (१३) बंडगर कमल भानुदास इत्यादी .

तसेच नाना बंडगर यांनी ग्रामस्थांचे ऋण कधीच विसरणार नाही तसेच हा विजय माझा एकट्याचा नसून तुम्हा सर्व नागरिकांचा यात बहुमोल असा सिंहाचा वाटा आहे अशे आवर्जून सांगितले. तसेच इथून पुढच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना हाताशी धरून गावच्या विकासासाठी तसेच संस्थेच्या हितासाठी सर्व परी प्रयत्न करत राहील अशी ग्वाही नागरिकांना दिली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!