बार्शी तालुक्यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर छापा..
45,50,400/- रुपयांचा माल जप्त.. गुन्हे अन्वेषण पथकाची धाड..
प्रतिनिधी-शैलेश वाघमारे
दिनांक : – ०७/०३ / २०२२ पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बार्शी तालुक्यातील अवैध वाळू उपसा करणा – यांवर छापा , ४५ , ५०,४०० / – रूपयांचा माल जप्त . श्रीमती तेजस्वी सातपुते , पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना बार्शी तालुक्यामध्ये ओढे नदीमधून अवैधपणे वाळूचा उपसा करून तिचा मोठ्या प्रमाणात साठा करून ती बेकायदेशीरपणे विक्री करत असलेबाबत गोपनिय महिती मिळाली होती . सदर बातमीमधील माहितीवर कारवाई करण्यासाठी पो . नि . सुहास जगताप , स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि नागनाथ खुणे यांच्या विशेष पथकास आदेश दिले होते . प्रति , त्याप्रमाणे पोनि सुहास जगताप , स्थानिक गुन्हे शाखा , सोलापूर ग्रामीण यांनी सपोनि नागनाथ खुणे यांच्या पथकास मार्गदर्शन करून कारवाई करण्यासाठी रवाना केले होते . त्यावरून सदर पथकाने बार्शी येथे जावून | वाणेवाडी गावचे शिवारात नक्की कोठे वाळू आहे याबाबत माहिती काढली असता मौजे वाणेवाडी गावचे शिवारात एका ठिकाणी एकूण ०४ वाहनामध्ये काही इसम वाळू भरून घेवून थांबल्याची माहिती मिळाली . परंतू सदर वाहन धारक हे वाहनासह फरार होण्याची शक्यता असल्याने सपोनि खुणे व पथक हे पायी चालत वाहणे थांबलेल्या ठिकाणी गेले असता त्यांना तेथे ०१ टाटा हायवा , ०३ टॅम्पो अशी एकूण ०४ वाहने व त्यामध्ये १० ब्रास वाळू असा एकूण ४५,५०,४०० / – रूपयांचा माल मिळून आला . पोलीस पथकाने तेथे असलेल्या एकूण ०६ इसमांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी सदरची वाळू ही त्यांच्या मालकाच्या सांगण्यावरून मौजे उंडेगाव , ता . बार्शी येथून भरून घेवून आले असल्याची माहिती दिली . पोलीस पथकाने सदरची वाहने , वाळू ही जप्त केली | असून मिळून आलेले ०६ इसम व त्यांचे ०३ मालक यांच्याविरूध्द बार्शी तालुका पोलीस स्टेशन येथे गुरनं ६३ / २०२२ , भा.द.वि.क. ३७ ९ , ३४ पर्यावरण प्रतिबंध कायदा कलम ९ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे . सदरची कामगिरी ही मा . पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते , मा . अप्पर पोलीस अधीक्षक श्री . | हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री . सुहास जगताप याचे नेतृत्वाखाली श्री . नागनाथ खुणे , सहायक पोलीस निरीक्षक यांच्या पथकातील पोलीस अंमलदार श्री . प्रमोद माने , श्री . लाला राठोड , श्री . नितीनकुमार चव्हाण , श्री . अजय वाघमारे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यांनी बजावली आहे .