नुकतेच नेहरू युवा केंद्र व जिल्हाधिकार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा संमेलन पार पडले. यात वर्षभरात केलेल्या स्वच्छता मोहिमेत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या युवा मंडळनां माननीय जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्या मार्गदर्शनात उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, देपुटी सिओ जिल्हा परिषद स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग, डॉ. जालिंदर अडसुळे प्राचार्य समाजकार्य महाविद्यालय मोराने, जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र संघटन अशोक कुमार मेघवाल, वरिष्ठ लेखापाल नाना पाटील सर, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कृत करण्यात आले. आमच्या जय बाबा री युवा मंडळाला धुळे जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं, जितेंद्र राठोड याने जिल्हा युवा संसद 2 क्रमांक मिळवल्याबद्दल पुरस्कार, दोन वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक कर्तव्य बजावल्याबद्दल सन्मानित करण्यात आले . सर्व जय बाबारी टीम आनंदित असून जय बाबा री मंडळ अध्यक्ष जितेंद्र राठोड, प्रमोद शिरसाठ, राहुल राठोड यांनी पुरस्कार स्वीकारला.