सणराईज पब्लिक स्कूल,शेळवे येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा..!!
महिला सरपंच उपसरपंच यांचा केला सन्मान..!!
पंढरपूर प्रतिनिधी गणेश ननवरे
आज शेळवे येथील सणराईज पब्लिक स्कूल येथे जागतिक महिला दिन व महिला सन्मान सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला,कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. सुमित्राताई अभिजित पाटील व प्रमुख पाहुण्या लाईफ लाईन हॉस्पिटल च्या डॉ.सौ.मंजुषाताई संजय देशमुख यांच्या शुभहस्ते राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,त्यानंतर आपली घर गृहस्ती सांभाळून,चूल आणि मूल याच्या पलीकडे जाऊन गावगाडा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या सावित्रीच्या लेकी व परिसरातील गावच्या महिला सरपंच-उपसरपंच यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये वाखरी येथील सरपंच सौ.कविता तुकाराम पोरे, कौठाळी येथील सरपंच सौ.स्वाती दत्ता धुमाळ,भंडीशेगाव येथील सरपंच सौ.मनीषा प्रकाश एलमर,वाडीकुरोली येथील सरपंच सौ.अर्चना धनंजय काळे, शेळवे येथील सरपंच सौ. सुनिता अनिल गाजरे, पिराचीकुरोली येथील सरपंच सौ.मुमताज नासिर शेख, खेड भाळवणी येथील उपसरपंच सौ.अश्विनी अविनाश पाटील,व्होळे येथील उपसरपंच सौ.ज्ञानेश्वरी गणेश गावडे, वाडीकुरोली येथील उपसरपंच सौ.अर्चना राजेंद्र पाटील, उपरी येथील ग्रामपंचायत सदस्य सौ.पार्वती दत्तात्रय नागणे व शेळवे येथील ग्रामपंचायत सदस्य सौ.इंदुमती बाळासाहेब गाजरे इत्यादी यशस्वी महिलांचा सन्मान महिला दिनाचे औचित्य साधून करण्यात आला त्यानंतर पंढरपूर येथील लाइफलाईन हॉस्पिटल च्या तज्ज्ञ डॉक्टर सौ. मंजुषाताई संजय देशमुख यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात महिलांचा आत्मविश्वास वाढवला,महिलांचे आणि बाळांचे आरोग्य, आजार; उपचार,संस्कार याबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं व त्याचबरोबर महिला दिनाच्या निमित्ताने दि ८ मार्च ते ३१ मार्च पर्यंत लाइफलाइन हॉस्पिटल पंढरपूर मध्ये खास करून महिलांसाठी सर्व विभागातील कंसलटिंग अगदी मोफत व विविध आजारांवरील उपचार खर्चात २५ ते ३०% सवलत देणार असल्याचे आवर्जून सांगितले.

*त्याच बरोबर सुमित्राताई अभिजित पाटील यांनी उपस्थित सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच सर्व यशस्वी महिला सरपंच-उपसरपंच यांच्या कार्य कर्तृत्वाचा गौरव केला सणराईज पब्लिक स्कूल ही प्रशाला ग्रामिण भागातील एक अतिशय उपक्रमशील प्रशाला असून ती विध्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबद्द असते, शिवाय सामाजिक क्षेत्रात ही अग्रेसर असते, येथील अनेक विध्यार्थी गुणवत्ता यादीत झळकतात असे सांगून प्रशालेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या, वाखरी येथील सरपंच कविताताई पोरे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी छान कविता सादर करून महिलांना व प्रशालेस शुभेच्छा दिल्या,कौठळी येथील सरपंच सौ.स्वाती धुमाळ व शेळवे येथील सरपंच सौ. सुनिता अनिल गाजरे यांनीही उपस्थित सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन आपल्या शब्दातून प्रशालेविषयी गौरवोद्गार काढले, त्यानंतर प्रशालेची विध्यार्थीनी प्राची यलमर हिने छान असं वक्तृत्व सादर केलं, प्रशालेतील विविध परीक्षा आणि विज्ञान प्रदर्शन व उपक्रमातील गुणवंत विध्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षिस वितरण करण्यात आले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.मनिषा गोरे व सूत्रसंचालन कु. दिपाली लोखंडे यांनी केले तर सोनाली गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.उषा लामकाने,अन्नू शेख, सोफिया नदाफ, मालन जाधव,आरती सुरवसे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार सौ. प्रियंका गाजरे यांनी मानले, चहा पाणी आणि अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.