ज्ञानदीप प्रोग्रेसिव्ह स्कूल अँन्ड ज्यूनिअर काॅलेज मध्ये महिला दिन उत्साहात साजरा
पंढरपूर प्रतिनिधी गणेश ननवरे
नांदोरे येथील ज्ञानदीप प्रोग्रेसिव्ह स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज मध्ये महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी करकंब येथील सरपंच सौ. तेजमाला पांढरे या अध्यक्ष म्हणून लाभल्या होत्या. व प्रमुख पाहुणे माता पालक सौ. स्वाती पाटील होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कोरोना काळात मोलाची कामगिरी केल्याबद्दल संस्थेच्या वतीने अंगणवाडी सेविका सारिका शिंदे व आरोग्यसेविका अंजली कांबळे, वंदना कांबळे, अनिता गोसावी, अबोली कांबळे, मिरा पाखरे
यांचा सन्मान कार्यक्रमाच्या अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आला.
यानंतर उपस्थित माता पालक सौ. सुषमा तवटे , सौ. धानेश्वरी पाटील , सौ. स्वप्ना पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच ज्यूनिअर काॅलेज च्या विद्यार्थ्यांनी मोनाली बाबर , आशा गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या मुख्याध्यापिका नसरीन तांबोळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वात शेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी महिला दिनानिमित्त सर्व महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता साबळे यांनी केले. प्रास्ताविक दिपाली थिटे यांनी केले. आभारप्रदर्शन लक्ष्मी पाटील यांनी केले.