प्रभाग क्रमांक 18-ब मध्ये घुमतोय एकच नारा “बच्चा बच्चा बोले… शशिकला सुभाष महाजन यांचा नारा!”

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग क्रमांक 18-ब मध्ये घुमतोय एकच नारा “बच्चा बच्चा बोले… शशिकला सुभाष महाजन यांचा नारा!”

 

प्रभाग क्रमांक 18-ब मधील अनुभवी, सर्वसमावेशक आणि माता-भगिनींच्या विश्वासाचं प्रतीक असलेल्या शशिकला सुभाष महाजन यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस झपाट्याने वेग येत आहे. अनेक दिवसांपासून चालू असलेल्या जनसंपर्क मोहिमेदरम्यान काल ताईंना वेगळाच उत्साहजनक अनुभव आला. महिलांनी घराबाहेर येऊन त्यांना हात मिळवून पाठिंबा दिला, तर नागरिकांनी थेट शब्दांत सांगितले  “शशिकलाताईशिवाय पर्याय नाही!” या प्रेमळ प्रतिसादाने परिसरात निवडणुकीचे वातावरण वेगळ्याच उंचीवर पोहोचले आहे. या प्रचाराची खास गोष्ट म्हणजे प्रभागातील छोट्या बालकांपर्यंत ताईंचा पोहोचलेला स्नेह. रस्त्यावरून जाताना मुलं “शशिकलाताई… शशिकलाताई!” असे हाक मारताना दिसतात. त्यामुळेच प्रभागात एकच घोषणा जोर पकडतेय..

“बच्चा बच्चा बोले… शशिकलाताई महाजन!”

ताईंचा हा वाढता जनसंपर्क आणि निरलस, शांतपणे लोकांत मिसळण्याची शैली मतदारांच्या मनाला खोलवर भिडत आहे. त्यांच्या नेतृत्वातील अनुभव, संयम आणि लोकाभिमुख कार्यशैलीमुळे नागरिकांमध्ये दृढ विश्वास निर्माण झाला आहे. ताईंच्या सभोवती निर्माण होणारी गर्दी पाहून विरोधकांना अक्षरशः धडकी भरतेय. “यें गर्दी तकदीर की आहे, भाई!” अशा प्रतिक्रिया जनतेतून ऐकू येत आहेत. प्रत्येक गल्ली-बोळातून मिळणारा पाठिंबा, माता-भगिनींचा उत्साह आणि मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत पसरलेला प्रेमळ नाद पाहून हा वाढता जनाधार जणू विजयाची शाश्वती देऊ लागला आहे.

प्रभाग 18-ब मध्ये एकच चर्चा…

“नेतृत्व अनुभवी हवं… आणि मनापासून जनतेचं काम करणारं हवं, म्हणूनच शशिकलाताई महाजन!”

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!