प्रभाग क्रमांक 3 मध्ये कृष्ण रामसिंग बहारे उर्फ किरण भाऊ यांचा वाढता जनसंपर्क विरोधकांना धडकी!
प्रभाग क्रमांक 3 मधील जमीनीवरचे नेतृत्व, मनमिळावूपणा आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका यामुळे कृष्णा रामसिंग बहारे उर्फ किरण भाऊ बहारे सध्या जनतेच्या मनात दृढपणे घर करून बसले आहेत. “कोणाशी वैर नाही, नाही कोणासोबत प्रगतीचीं शर्यत ” हा त्यांचा सरळ आणि प्रामाणिक स्वभाव मतदारांना विशेष भावतोय. गेल्या काही दिवसांत त्यांच्या जनसंपर्काच्या तुफानी मोहिमेमुळे संपूर्ण प्रभागात कृष्णा भाऊच येणार अशी स्पष्ट चर्चा रंगली आहे. विविध समाजघटक, प्रतिष्ठित नागरिक, तरुण वर्ग, माता-भगिनी आणि उद्योजक या सर्व स्तरातून कृष्णा भाऊ बहारें यांना अभूतपूर्व पाठिंबा मिळत आहे. सोशल मीडियावरही त्यांचा प्रभाव प्रचंड वाढला असून “कृष्ण बहारें” या नावाभोवती सकारात्मक लाट निर्माण झालेली दिसते. जनतेच्या समस्या ऐकून त्यांचे समाधान करण्याची त्यांची तळमळ, सतत लोकांमध्ये राहणारी शैली आणि कोणताही दिखावा न करता केलेले सामाजिक कार्य यामुळे त्यांच्यावरील विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे.मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रभाग क्रमांक 3 मध्ये विरोधकांची चिंता वाढलेली दिसते. किरण भाऊंचा सरळ स्वभाव आणि सर्वसमावेशकता यामुळे त्यांच्यासाठी नगरसेवकपदाचा मार्ग अधिकच मोकळा होत चालला आहे. प्रभागात नवा उर्जावान नेता म्हणून उदयास येणाऱ्या कृष्णा भाऊ बहारे यांच्या प्रचारामुळे वातावरणात एकच सूर घुमतोय “या वेळेस प्रभाग 3 ची दिशा ठरवणार एकच नाव… कृष्ण बहारें!”