क्रिकेट सामान्यांचे राहुल रंधे यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण संपन्न …
बोराडी – जुने भामपूर गावात बिरसा मुंडा फायटर या क्रीडा मंडळाच्या वतीने क्रिकेट सामान्यांचे आयोजन करण्यात आले होते, हे सामने शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व क्रीडा प्रेमिसाठी आयोजित केले होते. याची सुरवात दि ९ नोव्हेंबर रोजी झाली असून आज २३ रोजी फायनल सामना होता.या अंतिम सामन्यात अतिशय अति तटीचा झाला असून जुने भामपूर येथील बिरसा मुंडा फायटर प्रथम विजेता संघ ठरला तर उप विजेता जय गणेश क्रीडा मंडळ निमझरी यांनी बक्षीस मिळवले. प्रथम विजेत्या संघाला ट्रॉफी व ३१,१११रु, द्वितीय २१,१११रु, तृतीय ११,१११रु. चे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
जुने भामपूर गावात बिरसा मुंडा फायटर या क्रीडा मंडळाच्या वतीने क्रिकेट सामान्यांचे आयोजन करण्यात आले होते.त्याचे बक्षीस वितरण बोराडी गावाचे उपसरपंच राहुल रंधे यांच्या हस्ते संपन्न झाले. सामना अतिशय अति तटीचा झाला असून जुने भामपूर येथील बिरसा मुंडा फायटर प्रथम विजेता संघ ठरला तर उप विजेता जय गणेश क्रीडा मंडळ निमझरी यांनी बक्षीस मिळवले. प्रथम विजेत्या संघाला ट्रॉफी व ३१,१११रु, द्वितीय २१,१११रु, तृतीय ११,१११रु. चे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
क्रिकेट सामान्यांचे आयोजन बिरसामुंडा फायटर क्रीडा मंडळचे अध्यक्ष श्रीराम भिल, धनराज भिल, संजय भिल, पांडुरंग भिल, मऱ्या भिल, संतोष ठाकरे यांनी उत्कृष्ट आयोजन केले.
या टूर्नामेंट मध्ये एकूण २८ संघ सामील झाले होते.
प्रथम बक्षीस राहुल रंधे, द्वितीय बक्षीस सयाजी बोरसे, तृतीय बक्षीस सुनील बागुल यांच्या वतीने देण्यात आले.
या प्रसंगी जुने भामपूर व परिसरातील क्रीडा प्रेमी, ग्रामस्थ उपस्थित होते.
