भाजप च्या नगराध्यक्ष पदासाठी पाठींबा जाहीर करणं म्हणजे ‘दोन हाणा, पण मला तुमची म्हणा’ अशी गत झाली आहे.

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा: राष्ट्रवादी अजित पवार पार्टीला भाजप ने महायुती मध्ये समाविष्ट करून न घेता ही नगराध्यक्ष पदासाठी पार्टीने कमळाला पाठींबा जाहीर करणे म्हणजे ‘दोन हाणा, पण मला तुमची म्हणा’ अशी गत झाली आहे अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे माजी तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे- पाटील यांनी केली आहे.
करमाळा नगरपालिका निवडणूकीत महायुतीचा धर्म पाळून राष्ट्रवादी अजित पवार गटाने युतीतून जागा मिळण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत भाजप वर विश्वास ठेवला परंतु शेवटच्या क्षणी भाजपा ने राष्ट्रवादीला गाफिल ठेऊन विश्वास घात करून युती न करता स्वबळावर सर्व उमेदवार भाजपने जाहीर केले सांगोला नगरपालिका मध्ये जो डाव भाजपाने टाकला तोच डाव करमाळा नगरपालिका मध्ये खेळला गेला आहे असताना भाजप च्या नगराध्यक्ष पदासाठी पाठींबा जाहीर करणे म्हणजे ‘दोन हाणा, पण मला तुमची म्हणा’ अशी गत झाली असल्याची तीव्र टीका मांढरे पाटील यांनी केली आहे.
एक स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून माझ्या सारख्या असंख्य कार्यकर्तांनी भाजपा चा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती ही हनुमंत मांढरे- पाटील यांनी दिली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!