प्रभाग 10 अ मध्ये संघसंस्कारातून घडलेला नवा चेहरा विजय धनराज पाटीलचीं विजयी चर्चा
अमळनेर : विक्की जाधव.
नगरपरिषद निवडणूक 2025 च्या तोंडावर राजकारणाचे वारे चांगलेच वाहू लागले असून प्रभाग क्रमांक 10 अ मध्ये विशेष उत्सुकता पाहायला मिळतेय. बालपणापासून संघाच्या संस्कारात घडलेला तरुण विजय धनराज पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून राजकारणात दमदार entry घेताय. नवा उमेदवार, नवे विचार आणि स्वच्छ प्रतिमा यामुळे त्यांच्याभोवती उत्सुकतेचे आणि पाठिंब्याचे वर्तुळ झपाट्याने तयार होत आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका, तरुणांमधील मजबूत पकड आणि शहरातील धार्मिक-सामाजिक उपक्रमांत सातत्याने असलेला सहभाग यामुळे विजयची ओळख एक धडाडीचा, सक्रिय आणि शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून झाली आहे. संघाच्या मार्गदर्शनातून आलेली शिस्त, संघटन कौशल्य, आणि लोकांशी जुळवून घेण्याची त्यांची सहज क्षमता यामुळे प्रभाग 10 मध्ये “विजय शिवाय पर्याय नाही” अशी चर्चा सुरू झाली आहे. प्रभागातील स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा आणि तरुणांसाठी निर्माण होणाऱ्या संधी यावर ठोस दृष्टी ठेवून विजय पाटील विकासाचा नवा मॉडेल म्हणून मतदारांसमोर उभा राहिला आहे. अपक्ष राहून थेट लोकांवर विश्वास टाकण्याचा आणि निडरपणे काम करण्याचा त्यांचा निर्धार मतदारांना आपलासा वाटतोय. म्हणून प्रभाग 10 अ मधील निवडणूक वातावरणात विजय पाटील या नव्या उमेदवारामुळे विजयी चर्चेत आली आहे.