प्रभाग 17 मध्ये ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्ती’ भावना ताईंच्या उमेदवारीने निवडणुकीत नवी उठाठेव!
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या धामधुमीत प्रभाग क्रमांक 17 हा सर्वाधिक चर्चेत असलेला प्रभाग ठरत आहे. वर्षानुवर्षे पैशाचा माज, सत्तेची मक्तेदारी आणि मतदारांना कमी लेखण्याची सवय या सगळ्यांविरुद्ध यंदा मतदार उभे ठाकले आहेत.

“यावेळी नाही चालणार पैशाची दादागिरी… आता नाव एकच भावना ताई.. भावना ताई… !”
असा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे. धनशक्तीला आव्हान देणारी जनशक्ती आता प्रभाग 17 मध्ये ठामपणे रिंगणात उतरली आहे. ठेकेदारांना हद्दपार करून मतदार आता त्यांना त्यांची जागा दाखवतील यात शंका नाही. भावना ताई कैलास सोनार यांची उमेदवारीने परिसरात अक्षरशः नवचैतन्य निर्माण झाले आहे. प्रभागातील थोर-थोर व्यक्ती, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकाचा एकाच सुरु..
“आता बदल ठरलेलाचं आहे. भावना ताई शिवाय पर्याय नाही!”
अनेक वर्षांपासून दुर्लक्षित ठेवलेले प्रश्न, परिसरातील गलिच्छ राजकारण आणि मतदारांना केवळ मतदानाच्या दिवशी आठवण करणारी जुनी पद्धत सफेद कपडे घालून खुर्ची मांडून बसने याला नागरिक कंटाळले आहेत. यंदा सामान्य लोकांनीच नेतृत्व बदलण्याची शपथ घेतली आहे. प्रभाग 17 मध्ये असलेले कचराचे ढीग, पाण्याचा बिकट प्रश्न, न झालेले रस्ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर खोदून ठेवले आणि प्रभागात कामाचा गाजावाजा करून नागरिकांची केलेली दिशाभूल, ही कामे जाणू मीच केले. महत्वाचे म्हणजे : ही कामे कोणत्या निधीतून केली जातात याठिकाणी प्रभागातील मतदारांची दिशाभूल गटारींची दुरवस्था आणि लाईट सारखे प्रश्न या सर्व समस्या चे कोणी वाली चं नाही कारण धनशक्ती.. म्हणुन आता निर्णय झालाय भावना ताईंच्या माध्यमातून सुटतील सर्व प्रश्न असा लोकांमध्ये मोठा विश्वास निर्माण झाला असून त्यांचे स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तिमत्त्व, लोकांमध्ये मिसळणारा स्वभाव आणि विकासाबद्दलची स्पष्ट भूमिका यामुळे मतदारांमध्ये चांगलाच उत्साह दिसून येतोय.
तर दुसरीकडे, तरुणांना व्यसनाधीनतेच्या सावटाखाली ढकलणाऱ्या जुन्या पद्धतीला प्रभागातील पालकांनीच जोरदार विरोध केला आहे. “आमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित हवं आणि तो बदल फक्त भावना ताईच करू शकतात!” असे म्हणत युवक आणि पालक दोघेही त्यांच्या मागे उभे राहिल्याचे चित्र दिसत आहे. त्यांना प्रभागातून मिळणारा प्रतिसाद त्यामुळे प्रभाग क्रमांक 17 मध्ये यंदाची निवडणूक म्हणजे केवळ उमेदवारांचा सामना नसून, धनशक्तीला दिलेलं जनशक्तीचं उत्तरंच समाजा.
सविस्तर पुढे