प्रभाग 3 मध्ये ‘खऱ्या कामाचा बहारे’ कृष्णा रामसिंग बहारे यांच्या उमेदवारीने निवडणूक रंगात!

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग 3 मध्ये ‘खऱ्या कामाचा बहारे’ कृष्णा रामसिंग बहारे यांच्या उमेदवारीने निवडणूक रंगात!

 

अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 ची रणशिंगे वाजताच प्रभाग क्रमांक 3 मध्ये वेगळीच धडाडी जाणवू लागली आहे. इथे सध्या एकच नाव चर्चेत आहे कृष्णा रामसिंग बहारे! शांत स्वभाव, पण कामात वाघ… लोकांचे प्रश्न ऐकण्यात पुढे आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी नेहमी आघाडीवर अशी ओळख असलेला हा तरुण नेता आता प्रभाग 3 मध्ये नव्या ऊर्जा, नव्याजोमाने मैदानात उतरला आहे. “बहारे म्हणजे काम, वचन नाही!” अशी भावना मतदारांमध्ये ओतप्रोत भरली आहे.

परिसरातील रस्ते, पाणी, स्वच्छता, गटारी, लाईट अनेक वर्षांपासून राजकारणाच्या भोवऱ्यात अडकलेल्या प्रश्नांवर बहारे यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. इतर फक्त निवडणुकीला दिसतात, पण बहारे हे वर्षभर लोकांमध्ये मिसळलेले, त्यांच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभे राहणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच त्यांच्या उमेदवारीची घोषणा होताच नागरिकांमध्ये वेगळाच उत्साह पसरला आहे. “या वेळी प्रभाग 3 मध्ये बदल नाही, तर बहाराच बहार!” अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. कृष्णा बहारे यांच्या प्रचाराची शैलीही तशीच सरळ, साधी आणि थेट पैशाचे प्रदर्शन नाही, मोठमोठ्या दिखाव्याचे बॅनर नाहीत, फक्त कामांचा मजबूत इतिहास आणि लोकांशी असलेला नितळ विश्वास. वृद्ध, महिला, तरुण, सर्वच वयोगटातील लोक त्यांना मदतीला धावणारा ‘आपला माणूस’ मानतात. यामुळे प्रभागातील मतदार स्वतःहून प्रचारात सहभागी होत आहेत, घराघरांतून आवाज उठतोय “कृष्णा भाऊ बहारेच!” युवकांसाठी संधी, वयोवृद्धांसाठी सुविधा, महिलांसाठी सुरक्षित व स्वच्छ परिसर आणि सर्वांसाठी सुटसुटीत नागरी सुविधा या चौफेर दृष्टीकोनासह बहारे मतदारांसमोर ठोस प्लॅन घेऊन उभे आहेत. “विकास हवा तर किरण भाऊ बहारे हवाच!” या भावनेने प्रभाग क्रमांक 3 मधील निवडणूक आता थरारक आणि अत्यंत एकतर्फी दिसू लागली आहे. कृष्णा रामसिंग बहारे यांच्या उमेदवारीने प्रभाग 3 मध्ये निर्माण झालेलं वातावरण फक्त प्रचार नाही. ते जनतेचा विश्वास, आशा आणि बदलाची प्रचंड गरज बोलून दाखवत आहे!

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!