बोगस शालार्थ आयडी घोटाळा. अमळनेरपर्यंत पोहोचणारच होता, तपासाचा मागोवा.

अपनी भाषा में पढ़े! Translate

बोगस शालार्थ आयडी घोटाळा. अमळनेरपर्यंत पोहोचणारच होता, तपासाचा मागोवा

पोलीस अधिकाऱ्यानेच पुरावे केले नष्ट; बोगस संस्थाचालक शिंदेच्या कारभाराने शिक्षण विभाग हादरला!

 

अमळनेर : विक्की जाधव 

बोगस शालार्थ आयडी प्रकरणाने राज्यातील शिक्षण विभागात खळबळ माजवली आहे. यासंदर्भात मार्मिकने वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर नाशिक येथील तत्कालीन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना अखेर अटक करण्यात आली असून, त्यांनी या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे नष्ट केल्याचे तपासात उघड झाले आहे. गिरी यांच्या चौकशीनंतर तपासाचे सूत्र थेट भडगाव आणि अमळनेरकडे वळले आहे.

दोन दिवसांपासून अमळनेर येथे आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी अतुल डहाके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ठाण मांडले होते. सीसीटीव्ही फुटेज आणि सीडीआर रिपोर्टच्या आधारे शिंदे नावाच्या संस्थाचालकाच्या संशयास्पद हालचालींचा माग काढला गेला. शिंदेच्या घराची जाड जळती घेण्याआधीच काही संशयित पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांनी या बोगस संस्थाचालकांना थेट आश्रय दिल्याचा गंभीर आरोप होत आहे.

२०१२ पासून बोगस कर्मचाऱ्यांना घरी बसून पगार देण्यात येत असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. इतकेच नव्हे, तर काही प्रतिष्ठितांच्या नातेवाईकांना या संस्थेत बनावट नोकऱ्याही देण्यात आल्याची चर्चा अमळनेरभर रंगली आहे. लाखो रुपयांची उकळपट्टी करून शिक्षण व्यवस्थेवर काळी छाया टाकणारा हा गोरखधंदा अखेर उघड झाला आहे.

दरम्यान, पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना वरिष्ठ अधिकारी संदीप कर्णिक यांनी निलंबित केले असून, तपासाचा फास आता मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. “शिंदेचे झाले वांदे” असे म्हणत अमळनेरमध्ये नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरलेला हा घोटाळा, आता थेट काळ्या धंद्याच्या मुळावर प्रहार करेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुढील वृत्त लवकरच.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...

‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

error: Content is protected !!