पंचवीस वर्षांनंतर पुन्हा एकाच बेंचवर आले माजी विद्यार्थी डांगरी येथे पार पडले गेट टूगेदर

अपनी भाषा में पढ़े! Translate

पंचवीस वर्षांनंतर पुन्हा एकाच बेंचवर आले माजी विद्यार्थी डांगरी येथे पार पडले गेट टूगेद

अमळनेर : विक्की जाधव 

26 ऑक्टोंबर 2025 रोजी अमळनेर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा प्र.डांगरी येथे 1999-2000 बॅच या शैक्षणिक वर्षात एकत्रित असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच संपन्न झाला.तब्बल 25 वर्षांनंतर एकत्र येत डागरी येथील न्यू इंग्लिश स्कुलच्या वर्ग मित्र मैत्रिणीनी जुन्या आठवणींना वाट मोकळी करून दिली.

खरतर 25 वर्षानंतर सर्व विद्यार्थी एकत्र येतील की नाही? यात सुरुवातीला विशेष वाटले.कारण 25 वर्षाचा कालखंड हा खूप मोठा होता.42 विद्यार्थ्यांपैकी 32 जणांनी हजेरी लावली.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाणे झाली.माजी मुख्याध्यापक बी एस चौतमल हे अध्यक्षस्थानी होते.यावेळी उपस्थित आजी माजी शिक्षकांचा यथोचित शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.हा स्नेहमेळावा जी प प्राथमिक शाळा डांगरी येथे एकमेकांची विचारपूस करीत,उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

वर्गात जावून शिक्षकांकडून अध्यापनचा अनुभव घेतला.यावेळी विविध प्रकारचे खेळ खेळत आनंद लुटला.अनेकांनी मनसोक्त नाचून आनंद द्विगुणीत केला.1999-2000 बॅचची आठवण शाळेला वर्ग मित्रांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची मोठी प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.त्यांनतर सामूहिक फोटो सेशन पार पडले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील कोळी व इतर मित्रांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मुकेश शिसोदे यांनी केले.तर,आभार राकेश पवार यांनी मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!