“रन फॉर युनिटी”साठी सज्ज अमळनेर! पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांचे नागरिकांना आवाहन.

अपनी भाषा में पढ़े! Translate

 “रन फॉर युनिटी”साठी सज्ज अमळनेर! पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांचे नागरिकांना आवाहन.

अमळनेर : विक्की जाधव. 

भारताचे पहिले गृहमंत्री आणि लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त “रन फॉर युनिटी” हा एकात्मतेचा आणि देशभक्तीचा संदेश देणारा भव्य उपक्रम ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.०० वाजता महाराणा प्रताप चौक, अमळनेर येथे पार पडणार आहे.

हा उपक्रम अमळनेर पोलीस स्टेशनतर्फे आयोजित करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी समस्त अमळनेरकरांना या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

शहरातील सर्व शासकीय अधिकारी-कर्मचारी, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, विविध संस्थांचे सदस्य, शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार बांधव, महिला दक्षता समिती सदस्य आणि तरुण मंडळी यांनी या एकात्मता दौडीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!