करवाढ, शास्ती व लोकवर्गणी रद्द करा – अन्यथा १७ ऑगस्टपासून तीव्र आंदोलनाचा इशारा..
अमळनेर : विक्की जाधव.
आमदार श्री. शिरीष दादा चौधरी मित्र परिवार आघाडीतर्फे अमळनेर नगरपरिषद मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना करवाढ, शास्ती (२% व्याज), मालमत्ता हस्तांतरण शुल्क आणि लोकवर्गणी रद्द करण्यासाठी अंतिम निवेदन देण्यात आले.

कार्यकर्त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, अमळनेरकरांवर लादलेली करवाढ व लोकवर्गणी रद्द करण्यासाठी गेली दोन वर्षे सनदशीर मार्गाने पाठपुरावा करण्यात आला, मात्र मुख्याधिकारी फक्त आश्वासने देत वेळकाढूपणा करत असून, करवसुली मात्र संक्तीने सुरू आहे. पत्रकार बांधवांनी यापूर्वीही हा मुद्दा उपस्थित केला असतानाही प्रशासन ‘कुंभकरणी’ झोपेत असल्याचा आरोप करण्यात आला. यावरून अमळनेर न.पा. चे मुख्य अधिकारी किती निष्क्रिय आहेत हे समजते. राज्य शासनाने शास्ती माफी आणि मालमत्ता हस्तांतरण शुल्काबाबत निर्णय घेतलेला असतानाही नगरपरिषद वसुली करत असल्याचेही कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले.
१५ ऑगस्टपर्यंत करांच्या हितार्थ निर्णय न घेतल्यास १७ ऑगस्टपासून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन रणजितनाना पाटील, नरेश कांबळे, बाळासाहेब संदानशिव, सैय्यद कादिर, मनोज शिंगाणे, राहुल कंजर, पंकज भोई, प्रकाश माळी, पंकज चौधरी, नविद शेख, दिपक चौगुले, पंकज मोरे, भरत पवार, विपुल पाटील, शुभम यादव, नईम पठाण, कुंदन पाटील, पारस धाप, सागर साळी, राम खेडकर आदींच्या स्वाक्षरीसह देण्यात आले.