प्रताप महाविद्यालयात केमिस्ट्री दिन उत्साहात साजरा
अमळनेर : विक्की जाधव
खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागात थोर वैज्ञानिक आचार्य प्रफुल्लचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय रसायनशास्त्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख व्याख्याते प्रा. डॉ. जयेश गुजराथी (माजी उपप्राचार्य व माजी विभागप्रमुख) यांनी रॉय यांच्या संशोधन कार्य, ग्रंथसंपदा व सामाजिक योगदानावर सखोल प्रकाश टाकला. “रसायनशास्त्र हा केवळ सूत्रांचा विषय नसून समाज बदलण्याची शक्ती असलेली भाषा आहे,” असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. डॉ. निलेश पवार यांनी भूषविले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. अमोल मानके यांनी करताना आचार्य रॉय यांचा जीवनपट दृकश्राव्य माध्यमातून सादर केला, जो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. यशस्वी आयोजनासाठी डॉ. मिलिंद ठाकरे, डॉ. रवी बाळस्कर, डॉ. विवेक बडगुजर यांसह प्रा. रामदास सुरळकर, प्रा. हर्षल सराफ, प्रा. मनीषा मोरे, प्रा. वैशाली राठोड, प्रा. प्रियंका पाटील आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या यशासाठी प्राचार्य डॉ. अरुण जैन व संस्थेचे चिटणीस प्रा. पराग पाटील यांचे मार्गदर्शन लाभले, तर खान्देश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाले. आभार प्रा. संतोष दिपके यांनी मानले. प्रेरणादायी विचार, दृकश्राव्य सादरीकरण आणि सर्वांच्या सहकार्यामुळे केमिस्ट्री दिन संस्मरणीय ठरला.