June 30, 2025 9:14 pm

ई-श्रमिक कार्डमुळे असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल- गटनेते कैलास कदम.

अपनी भाषा में पढ़े! Translate

ई-श्रमिक कार्डमुळे असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल- गटनेते कैलास कदम.

इंदापूर प्रतिनिधी – आदित्य बोराटे

सरकार कामगारांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेऊन त्यांच्या क्षमतेप्रमाणे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतील अशी माहिती इंदापूर नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम यांनी दिली.

महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा अंकिता शहा व गटनेते कैलास कदम यांच्या पुढाकारातून शहरातील श्रीराम मंदिर तसेच संत रोहिदास मंदिर याठिकाणी मोफत ई-श्रम कार्ड शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ६०० नागरिकांनी श्रमिक लेबर कार्डची नोंदणी केली.शिबीराचे उदघाटन शहराध्यक्ष शकील सय्यद यांचे हस्ते करण्यात आले होते.

यावेळी बच्चू कांबळे,सुनिल गलांडे,विठ्ठलराव ननवरे,विजय हराळे,दादासाहेब देवकर,अंकुश डांगे,अमोल भिसे,अफसर मोमीन उपस्थित होते.यावेळी बोलताना कैलास कदम म्हणाले की सर्व असंघटित कामगारांसाठी केंद्र सरकारने श्रमिक लेबर कार्ड योजना काढली आहे.१६ ते ५९ वर्षे वय असणाऱ्या नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. शेतमजूर, सुतार, कुंभार, न्हावी, रस्त्यावरचे विक्रेते,बांधकाम कामगार, लेदर कामगार, भाजी व फळ विक्रेते,लोहार, प्लंबर,गवंडी,घरकाम करणाऱ्या महिला, कापड दुकानातील कामगार व इतर १५० हून अधिक प्रकारच्या व्यवसायातील असंघटित कामगार श्रमिक लेबर कार्ड काढू शकतात.सरकारला कामगारांसाठी धोरण व कार्यक्रम राबविण्यास मदत होईल. नोंदणी केल्यानंतर दोन लाखांचा अपघाती विमा,अपंगत्व आलेस एक लाखाची आर्थिक मदत होईल.

भविष्यात अनेक शासकीय योजनांचे लाभ मिळू शकतात. नियमित पगार, वेतन आणि भविष्य निर्वाह निधी आणि ग्रँच्युइटीच्या रूपात आणि सामाजिक सुरक्षा यासह इतर लाभ घेण्याऱ्यास हे कार्ड काढता येणार नाही तसेच नोंदणी केलेल्या नागरिकांना दिड महिन्यानंतर श्रमिक कार्ड दिले जाईल अशी माहिती कदम यांनी दिली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.इस्माईल जमादार,प्रा.मीना कदम,अनिकेत साठे,ओंकार माने,अमित हराळे,गणेश जगताप,ऋषिकेश मोहिते यांनी सहकार्य केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!