June 30, 2025 1:50 pm

महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र नागेश्‍वर सेवा संस्थान येथे मंगळवारी दि. १ मार्च रोजी पावन दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर : महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र नागेश्‍वर सेवा संस्थान येथे मंगळवारी दि. १ मार्च रोजी पावन दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थानचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी केले आहे.श्री क्षेत्र नागेश्‍वर सेवा संस्थान, नागेश्वर अजनाड बंगला येथे महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र नागेश्‍वर सेवा संस्थान येथे मंगळवारी दि. १ मार्च रोजी पावन दर्शनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे.श्री नागेश्वर मंदिराच्या पायथ्याशी सुरुवातीलाच गोमुख दर्शन होते.

याठिकाणी महत्त्वाचे म्हणजे कालसर्प पूजा, नागबली पूजा सुद्धा कमीतकमी खर्चात केली जाऊ शकते. कारण, आवश्यक अशा सर्व धार्मिक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. येथे उंबर, महादेव मंदिर, पाणी, गोमुख, अमर धाम, गोशाळा अशा सर्व बाबींची उपलब्धता नागेश्वर येथे झाली आहे.श्रीक्षेत्र नागेश्वर सेवा संस्थान अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम खूपच मोठ्या प्रमाणात केले असून या ठिकाणी नव्याने श्री गणपती मंदिर, पार्वतीमाता, श्री शंभू महादेवाचे मंदिर, श्री गुरुदत्त, श्री ऋषि महाराज, श्री हनुमंत, मोती माता मंदिर भव्य दिव्य स्वरूपात निर्माण करण्यात आले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून महाशिवरात्री निमित्त दर्शनाच्या या ठिकाणी लाभ घेऊ शकतात, असे श्री नागेश्वर सेवा संस्थान अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी कळविले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!