धुळे जिल्ह्यातील केमिस्ट,फार्मसिस्ट व मेडिकल दुकानदार यांना कोणत्याही नवीन नवीन कारणाने देणगीच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या गावगुंड यांचे..

अपनी भाषा में पढ़े! Translate

धुळे जिल्ह्यातील केमिस्ट,फार्मसिस्ट व मेडिकल दुकानदार यांना कोणत्याही नवीन नवीन कारणाने देणगीच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या गावगुंड यांचे बंदोबस्त करावे असे निवेदणाव्दारे धुळे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्याकडे मागणी..

धुळे जिल्ह्यात केमिस्ट,फार्मसिस्ट, मेडिकल दुकानदार व इतर व्यावसायिक व्यापारी यांना नवीन नवीन कारण सांगून विविध प्रकारच्या देणगीच्या नावाखाली व्यापारी व व्यावसायिकांना गावगुंड त्रास देत असतात व देणगी कमी जास्त किंवा नाही दिली तर धमकी, बघून घेईल,थांब महिला आणतो दुकानावर विनयभंग ची केस करतो असे विविध कारण सांगून देणगीच्या नावावर खंडणी मागणाऱ्या गुन्हेगार प्रवृतीचे गावगुंडाचा बंदोबस्त करावा अशी मागणी धुळे जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
वेळेतच या गुन्हेगार प्रवृत्तीचा गावगुंड यांचा बंदोबस्त नाही झाल्यास संघटना बंदची हाक देईल व अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करेल असे कळविण्यात आले.
यावेळी जितेंद्र जैन बंब,विजय चौधरी,दिनेश खंडेलवाल,सतीश मुथा, सुभाष जैन, चंद्रकात बंब संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!