फार्मसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
अमळनेर : विक्की जाधव
खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरिनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि स्व. र. का. केळे कॉलेज ऑफ बी.फार्मसी येथे विद्यार्थ्यांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ कृत्रज्ञता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कल्याणी लांडगे व रिमझिम तोलानी यांनी केले. कु. रेणुका जोशी व कु. वेदांती चौधरी यांनी भक्तीगीत सादर करून वातावरण भक्तिमय केले, तर कु. साक्षी सोनवणे, कु. अश्विनी चौधरी आणि कु. वैष्णवी पाटील यांनी गुरूंविषयी आपले मनोगत व्यक्त केले.

या वेळी प्राचार्य प्रा. डॉ. रविंद्र सोनवणे यांनी विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त अशा पुस्तकांचा ग्रंथालयास भेट दिली. त्यांच्या या उपक्रमाचे उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी मनःपूर्वक कौतुक केले. प्रा. रविंद्र माळी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्राचार्यांच्या या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रा. देवेश भावसार, प्रा. प्रफुल्ल चव्हाण, प्रा. प्रितम पाटील, प्रा. सतीश ब्राम्हणे, प्रा. छाया महाजन, प्रा. स्वप्नाली महाजन, प्रा. गीतांजली पाटील, प्रा. वर्षा पाटील, प्रा. प्रियांका महाजन तसेच सौ. कविता शिंपी यांच्यासह श्री. अनिल महाजन, श्री. ज्ञानेश्वर चौधरी, श्री. जितेंद्र पाटील, श्री. शिवाजी पाटील, श्री. विनय ब्राम्हे व श्री. प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन आणि प्रा. डॉ. रविंद्र सोनवणे यांनी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.