अहिल्यानगर ॲट्रॉसिटी प्रकरणात आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

अपनी भाषा में पढ़े! Translate

अहिल्यानगर ॲट्रॉसिटी प्रकरणात आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला..

 

 मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव

अहिल्यानगर येथील ॲट्रॉसिटी प्रकरणात आरोपी प्रशांत रोमन याचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. फिर्यादी अंतोन गायकवाड यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. आरोपीने जातीवाचक शिवीगाळ, अंगावर थुंकणे आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. जिल्हा सत्र न्यायालयानेही जामीन फेटाळल्यानंतर आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र ॲट्रॉसिटी कायद्यानुसार अटकपूर्व जामीनास कायदेशीर अडथळा असल्याने न्यायालयाने तो नाकारला. फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. निलेश भागवत व अ‍ॅड. अजय तांदळे यांनी काम पाहिले.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!