लायन्स क्लब अमळनेरचा प्रतिष्ठापना सोहळा व अशोक समेळ यांचे विशेष व्याख्यान! 

अपनी भाषा में पढ़े! Translate

लायन्स क्लब अमळनेरचा प्रतिष्ठापना सोहळा व अशोक समेळ यांचे विशेष व्याख्यान ! 

 

अमळनेर : विक्की जाधव.

लायन्स क्लब अमळनेरच्या वतीने रविवार, ६ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता हॉटेल मिड टाऊन येथे वर्ष २०२५-२६ करिता प्रतिष्ठापना समारंभ (Installation Ceremony) संपन्न होणार आहे. या वेळी नवनिर्वाचित  अध्यक्ष म्हणून लायन डॉ. संदीप जोशी कार्यभार स्वीकारणार आहेत. या खास प्रसंगी प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते श्री. अशोक समेळ यांचे प्रेरणादायी व्याख्यान होणार असून, त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला एक वेगळीच रंगत मिळणार आहे.

लायन्स क्लबच्या सामाजिक कार्याचा नवा टप्पा सुरू होतानाचा हा उत्सव, निश्चितच अमळनेरकरांसाठी एक स्मरणीय अनुभव ठरणार आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!