बहुप्रतीक्षित असलेला निम्न तापी प्रकल्प (पाडळसरे धरण) आता निर्णायक टप्प्यात पोहचेल अशी अपेक्षा ?

अपनी भाषा में पढ़े! Translate

पाडळसरे प्रकल्पाचे इतिवृत जाहिर होताच ते मी केले म्हणुन आम्ही मोकळे..

भाग 4

 

 

अमळनेर : विक्की जाधव

तालुक्यातील बहुचर्चित आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेला निम्न तापी प्रकल्प (पाडळसरे धरण) आता निर्णायक टप्प्यात पोहचेल अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पाला नुकतीच PIB (Public Investment Board) कडून सैद्धांतिक स्टेज 1 ची मान्यता ( टप्पा 1 ) मिळाल्यानंतर,

निम्न तापी प्रकल्प (पाडळसरे धरण) केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY – AIBP) अंतर्गत आणण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा पार करण्यात आला आहे. १२ जून रोजी दिल्लीत झालेल्या जलशक्ती मंत्रालयाच्या गुंतवणूक मंडळाच्या (PIB) बैठकीत या प्रकल्पाला “स्टेज-1”(टप्पा 1) मान्यता देण्यात आली. ही मान्यता अंतिम मंजुरी नसली तरी, योजना यशस्वीतेच्या दिशेने पहिला अधिकृत निर्णय मानला जात आहे. यावरून आमदार आणि खासदार यांचे आरोप प्रत्यारोप होत आहे.

 

काय आहे स्टेज-1 म्हणजे काय? टप्पा 1 

या मंजुरीचा अर्थ असा की पाडळसरे प्रकल्पास केंद्र योजनेत समाविष्ट करण्याचा प्राथमिक स्वीकृती निर्णय. या टप्प्यात राज्य शासनाने सविस्तर प्रस्ताव, पुनर्वसन आराखडा, भूसंपादन तपशील, खर्च इ. माहिती सादर करावी लागेल. त्यानंतरच केंद्र शासन निधी वितरित करण्यास सक्षम होईल. दिल्लीतील या बैठकीला नीती आयोग, जलशक्ती मंत्रालय, पर्यावरण, कृषी, अर्थ, कामगार, आणि पंचायत राज मंत्रालयाचे सचिव उपस्थित होते, बैठकीत प्रकल्पाच्या प्रथम टप्प्याला मंजुरी देण्यात आली असून, त्यानुसार केवळ अडवण्यात येणाऱ्या पाण्याच्या क्षेत्रापुरतेच जमीन अधिग्रहण आणि पुनर्वसनाचे काम होईल.

 

राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया..

या निर्णयानंतर लोकप्रतिनिधींच्या प्रतिक्रिया काही माध्यमांशी बोलताना आ. अनिल पाटील म्हणाले,

 “मंजूरी आदेश पाहून विरोधकांनी आता आनंदोत्सव साजरा करावा. आम्ही लोकांसमोर नेहमी खरेच मांडतो.”

तर

खा. स्मिता वाघ यांनी थेट सोशल मीडिया हँडलवर पत्रक प्रसिद्ध करत

“बोलणारे बोलून गेले, आम्ही शांतपणे काम करत राहिलो. खरं असतं त्याला वेळ लागतो, पण उत्तर हमखास मिळतं.”

 

अशी असेल पुढील प्रक्रिया.

जलशक्ती मंत्रालय प्रकल्पाच्या स्टेज-1 (टप्पा 1) संदर्भातील अधिकृत आदेश जारी करेल. मग राज्य शासनाने ठराविक कालावधी मागून सविस्तर अहवाल सादर करावा लागेल. त्या कालावधीत: पुनर्वसन आराखडा, जमिनीचे हस्तांतरण, पर्यावरण परवाने, वित्तीय व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यानंतर केंद्र सरकारचा निधी मंजूर होऊ शकेल.

स्टेज 2 टप्पा-२ साठी पुन्हा हीच प्रक्रिया पार पाडावी लागेल.

निष्कर्ष

पाडळसरे प्रकल्पाच्या स्टेज-1 (टप्पा 1) मंजुरीमुळे केंद्रातील यंत्रणा सक्रिय झाली असून, आता राज्य शासनाच्या तत्परतेवर पुढचा टप्पा अवलंबून आहे.

सिंचन स्वप्नाचे एक महत्त्वाचे पाऊल यशस्वीरीत्या टाकले गेले आहे – आता जनतेला प्रत्यक्ष काम सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!