अमळनेर क्रीडा संकुलाचा मुद्दा पेटला – क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आक्रमक निवेदन

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर क्रीडा संकुलाचा मुद्दा पेटला – क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आक्रमक निवेदन

 

अमळनेर :  विक्की जाधव

राज्य शासनाच्या क्रीडा धोरणांतर्गत मंजूर झालेलं अमळनेर तालुका क्रीडा संकुल आजतागायत अपूर्णच! युवकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना जोरदार निवेदन दिलं आहे.

आ. अनिल पाटील यांनी त्यावेळी प्रसिद्ध केलेले पत्रक 

  शिवराम काका पाटलांचा गंभीर आरोप

क्रीडा संकुलाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शिवराम काका पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना विरोध करत काही स्थानिक तरुणांनी वाद घातला. “सत्ताधाऱ्यांच्या अपूर्ण कामावर प्रश्न विचारल्यावर विरोधासाठी गुंड पाठवले जातात,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

पत्रकारांसोबत बोलताना : शिवराम काका पाटील सोबत उजवीकडून संतोष पा. डावीकडुन ईश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखालील संघटनेने प्रशासनावर दबाव वाढवण्याचा इशारा दिला असून, शिक्षक, पालक, युवक आणि खेळाड्यांनी या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी. शिवराम काका पाटील, जयेश पाटील, भगवान पाटील, संतोष पाटील, ईश्वर पाटील आदी.उपस्थित होते.

“युवकांना खेळाच्या माध्यमातून उभं करण्याऐवजी, सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष त्यांना गमावून बसतंय,” असा हल्लाबोल करत अमळनेरच्या क्रीडा विकासाचा मुद्दा आता ऐरणीवर आणला गेला आहे.

 

संघटनेच्या प्रमुख मागण्या:

2009, 2015 व 2022 च्या शासन निर्णयानुसार संकुल तातडीने कार्यान्वित करावे.

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, एकलव्य पुरस्कार, ग्रामीण क्रीडा पुरस्कार यांचा लाभ अमळनेरच्या युवकांना मिळावा.

युवकांना शारीरिक व मानसिक विकासासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

 

न.पा. च्या पार्श्वभूमीवर लवकरच पुढील वृत्त.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!