अमळनेर तहसीलदार सुराणा ॲक्शन मोडमध्ये – अवैध रेती वाहतूक करणारे टेम्पो व ट्रॅक्टर पकडले

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर तहसीलदार सुराणा ॲक्शन मोडमध्ये – अवैध रेती वाहतूक करणारे अनेक टेम्पो व ट्रॅक्टर पकडले

 

अमळनेर : विक्की जाधव 

अमळनेर तालुक्यातील अवैध वाळू उपशावर नियंत्रण आणण्यासाठी तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी थेट कृतीत उतरून कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कार्यपद्धतीवर आरोप होत असताना, सुराणा यांनी माफियांना धडा शिकवत अवैध वाळू वाहतूक करणारे अनेक टेम्पो व ट्रॅक्टर थेट जप्त केले आहेत.

गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, रेती माफियांना मोठा झटका बसला आहे. विशेष म्हणजे या कारवाईसाठी  प्रत्यक्ष तपासणी आणि गुप्त रेकीच्या माध्यमातून यश मिळवण्यात आलं आहे.

तालुक्यातील काही भागांत रात्रीच्या वेळेस अवैध वाळू उपशा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली  अधिकाऱ्यानी धाबा धरून अचानक छापा टाकला. यावेळी वाळूने भरलेले अनेक टेम्पो व ट्रॅक्टर पकडण्यात आले. संबंधित वाहनांवर महसूल कायद्यानुसार कार्यवाही करण्यात आली आहे.

तहसीलदार सुराणा यांचा इशारा:

“अवैध रेती उपसा व वाहतुकीविरुद्ध कारवाई ही सुरूच राहणार असून, कोणीही कायद्यापेक्षा वरचढ नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

जनतेतून समाधान व्यक्त:

या कारवाईमुळे स्थानिक जनतेमध्ये समाधानाची भावना असून, अनेकांनी तहसीलदार सुराणा यांच्या कार्यशैलीचं कौतुक केलं आहे. गेल्या काही काळात सुराणा यांच्यावर निष्क्रियतेचे आरोप केले जात होते. मात्र या कारवाईने त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत “आरोपांना उत्तर कृतीतूनच द्यायचं” हे दाखवून दिलं आहे.

अमळनेर तालुक्यातील महसूल यंत्रणा अवैध वाळू उपशाविरुद्ध सज्ज झाली असून, यापुढील काळात अशा धाडसालाच थारा नसल्याचा मजबूत इशारा प्रशासनाने दिला आहे.

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!