June 28, 2025 8:48 pm

एक दिवसाची सयाजी राजे वॉटर पार्क ची पर्यटनाची मोहीम ठरली शेवटची वेळ;भिगवणचे तुषार धुमाळ यांचा अपघाती मृत्यू

अपनी भाषा में पढ़े! Translate

एक दिवसाची सयाजी राजे वॉटर पार्क ची पर्यटनाची मोहीम ठरली शेवटची वेळ;भिगवणचे तुषार धुमाळ यांचा अपघाती मृत्यू

(निलेश गायकवाड)

अकलूज च्या सयाजी राजे वॉटर पार्क मधील भीषण अपघातात फिरता पाळणा निसटला आणि तो निष्डून पडल्याने पाळण्यातील काहीजण जखमी झाले, यातील इंदापूर तालुक्यातील भिगवणचे तुषार धुमाळ यांचा यात मृत्यू झाला.

सयाजी राजे वॉटर पार्क मध्ये धुमाळ आणि त्यांचे सहकारी गेले होते. धुमाळ हे विमा प्रतिनिधी असून त्यांच्या सहकाऱ्यांनी एक दिवसाची सयाजी राजे वॉटर पार्क ची पर्यटनाची मोहीम आखली होती. पार्कमधील पाळणा फिरत असताना तो एक निसटला आणि त्यातून बसलेले तिघेजण गंभीर जखमी झाले. यामध्येच तुषार धुमाळ होते. तुषार धुमाळ यांना तातडीने अकलूज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

या निमित्ताने एडव्हेंचर पार्क तसेच पर्यटनाच्या ठिकाणचे पाळणे किंवा इतर साधने हाताळताना गंभीर गोष्टी घडणार नाही त्याची काळजीपूर्वक तपासणी करण्याची गरज आहे. अकलूजच्या सयाजी राजे वॉटर पार्क मध्ये तेथील साधनांची दुरुस्ती व्यवस्थित केली होती का? हा प्रश्न या निमित्ताने समोर आला असून या ठिकाणी पोलिसांनी भेट देत तपासाला सुरुवात केली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!