June 28, 2025 10:33 pm

पंढरपूर आषाढी वारी 2025 : दिंड्यांना मिळणार 20 हजारांचे अनुदान

अपनी भाषा में पढ़े! Translate

पांडुरंगाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी पंढरपूर आषाढी वारी : दिंड्यांना मिळणार 20 हजारांचे अनुदान

 

मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव 

तिर्थक्षेत्र पंढरपूर येथे येणाऱ्या आषाढी एकादशी वारीसंदर्भात राज्य शासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सन 2025 च्या वारीसाठी मानाच्या दहा पालख्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक अधिकृत दिंडीस रू. 20,000/- इतके अनुदान देण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

सदर निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागामार्फत अधिकृत शासन निर्णय (जी.आर.) द्वारे जाहीर करण्यात आला आहे. या अनुदानामुळे वारीच्या नियोजनात मदत होणार असून, दिंडी व्यवस्थापनासाठी खर्च भागविणे सुलभ होणार आहे.

वारीदरम्यान लाखो वारकरी पंढरीच्या वाटेवर असतात. त्यामुळे प्रशासनाकडून विविध स्तरावर नियोजन केले जाते. मानाच्या 10 प्रमुख पालख्या – देहू (तुकाराम महाराज), अळंदी (ज्ञानेश्वर म.), सासवड (सोपानदेव), पैठण (एकनाथ म.), त्र्यंबकेश्वर (निवृत्तिनाथ), नाशिक, पंढरपूर आदी स्थानिक पालख्यांचा समावेश आहे.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी आणि संतपरंपरेच्या जतनासाठी शासनाकडून ह्या निर्णयाचे स्वागत होत आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!